Abu Azmi : …तर मी माझे शब्द मागे घेतो आणि… वारीसंदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमींनी मागितली माफी

Abu Azmi : …तर मी माझे शब्द मागे घेतो आणि… वारीसंदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमींनी मागितली माफी

| Updated on: Jun 24, 2025 | 12:23 PM

'मी पुण्याहून येत होतो. तेव्हा मला लोकांनी सांगितलं की, पालखी जाणार आहे. त्यामुळे लवकर जा. नाहीतर रस्ता जाम होईल. रस्ता जाम होत आहे. पण आम्ही कधी विरोध केला नाही', असं अबू आझमी म्हणाले होते.

वारीसंदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमी यांच्याकडून आता माफी मागण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्या असतील शब्द मागे घेतो, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी वारीसंदर्भात अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. दरम्यान, टीकेची झोड उठवल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अबू आझमी यांनी माफी मागितली आहे. ‘वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. सोलापूरमध्ये मी नुकत्याच केलेल्या एका टिप्पणीबद्दल पसरलेल्या गैरसमजाचे मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझ्या वक्तव्याच्या विपर्यास केला गेला. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता’, असं अबू आझमी यांनी म्हटलंय.

Published on: Jun 24, 2025 12:23 PM