Sambhaji Bhide : शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांचं मोठं वक्तव्य, 6 जून ऐवजी…
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा केला जातो. यासंदर्भातच संभाजी भिडे यांनी मोठं वक्तव्य करत मोठी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करु नये, असं वक्तव्य करत संभाजी भिडे यांनी मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करु नये. तर त्या दिवशी साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद करावा आणि तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो. त्या दिवसाप्रमाणेच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, असे संभाजी भिडे म्हणाले.
