Sambhaji Bhide | लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणाऱ्या न्यायाधीशाला संपवलं पाहिजे :संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायाधीशांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. लिव्ह इन रिलेशनशिप काय बेशरम आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडें यांनी केले आहे.
मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायाधीशांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. लिव्ह इन रिलेशनशिप काय बेशरम आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडें यांनी केले आहे. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असेही संभाजी भिडे यांनी म्हटलंआहे.
