Sambhaji Raje | सरकारची माझ्यावर पाळत, हेरगिरी सुरु; संभाजीराजेंचा सरकारवर गंभीर आरोप
Sambhaji Raje | सरकारची माझ्यावर पाळत, हेरगिरी सुरु; संभाजीराजेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलंय. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचं संशय व्यक्त केला जातोय.
Published on: May 31, 2021 07:54 PM
