Sanjay Shirsat : ज्यांची रात्रीची उतरत नाही, ते.. ; हॉटेल लिलाव प्रकरणावरून शिरसाट-राऊतांमध्ये जुंपली

Sanjay Shirsat : ज्यांची रात्रीची उतरत नाही, ते.. ; हॉटेल लिलाव प्रकरणावरून शिरसाट-राऊतांमध्ये जुंपली

| Updated on: May 29, 2025 | 1:39 PM

Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : संभाजीनगर येथील हॉटेल लिलाव प्रकारावरून राऊत यांनी केलेल्या टीकेला आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे.

हॉटेल लिलावात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली गेली असल्याचं कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. हॉटेल लिलावाची सातवी वेळ होती, असंही शिरसाट म्हणाले. टक्केवारीवाल्यांनी बदनामीचं काम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेवरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते. त्यावर आज शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत राऊतांवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, लिलाव प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाली आहे. ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही, ते असं बोलतात. बोली लावताना डिपॉझिट भरावे लागते. ते भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. आता एका महिन्यात २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. मी सांगतो त्यावर विश्वास ठेऊ नका. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा. या हॉटेलच्या लिलावाची ही सातवी वेळ होती, असंही शिरसाट यांनी सांगितलं आहे.

Published on: May 29, 2025 01:38 PM