Ranjit Kasle : संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित रणजित कासले बडतर्फ

Ranjit Kasle : संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित रणजित कासले बडतर्फ

| Updated on: Apr 18, 2025 | 3:14 PM

Ranjit Kasle Dismissed : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वादग्रस्त विधान आणि व्हिडीओ बनवणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक अधिकारी रणजित कासलेला  सेवेतून बडतर्फ केले आहे. संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. व्यापाऱ्यासोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी रणजित कासले हा निलंबित होता. त्यानंतर आता त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यानंतर आज पहाटेच बीड पोलिसांनी रणजित कासले याला पुण्याच्या स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे.

Published on: Apr 18, 2025 03:12 PM