Yashwant Jadhav यांच्या घरी IT विभागाची धाड ; मनसे नेते Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 25, 2022 | 10:32 AM

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे.

Follow us on

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणण आहे. कोरोनाच्या काळात महापालिकेत सगळ्यात मोठा घोटाळा केला आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे मनसे नेते Sandeep Deshpande म्हणाले आहेत.