Sandeep Deshpande : विधान भवनात षंढ लोक बसलेत; संदीप देशपांडेंचं वादग्रस्त विधान

Sandeep Deshpande : विधान भवनात षंढ लोक बसलेत; संदीप देशपांडेंचं वादग्रस्त विधान

| Updated on: Jun 23, 2025 | 2:29 PM

Sandeep Deshpande Statement : विधीमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका करत वादग्रस्त विधान केलं आहे.

विधान भवनात षंढ लोक बसले आहेत, असं वादग्रस्त विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. विधीमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने त्यांनी ही टीका केली आहे.

संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विधान भवनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यावरून संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय हे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, सर्व मराठी माणसांना आमचं आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा, असंही देशपांडे यांनी म्हंटलं.

Published on: Jun 23, 2025 02:29 PM