धक्कादायक! सरकारी बिल थकलं, कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचललं, सगळेच हादरले

धक्कादायक! सरकारी बिल थकलं, कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचललं, सगळेच हादरले

| Updated on: Jul 24, 2025 | 8:51 AM

सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे रहिवासी असलेल्या हर्षल पाटील यांनी राज्य सरकारकडून कामाचे बिल वेळेवर न मिळाल्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीमुळे आर्थिक दबाव असल्याची चर्चा आहे, तसेच इतर विभाग आणि योजनांचा निधी वळवल्याचा आरोपही विरोधकांकडून सातत्याने होत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत अनेक सरकारी कामे काढली गेली होती. ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि छोट्या कंत्राटदारांनी घेतली आणि जवळपास पूर्णही केली. मात्र, या कंत्राटदारांना त्यांच्या पूर्ण झालेल्या कामांचे देयके मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून निधी उपलब्ध नाही. केंद्र सरकारनेही याबाबत निधी देण्यास असमर्थता दर्शवणारे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. या परिस्थितीमुळे कंत्राटदार त्रस्त झाले असून, हर्षल पाटील यांच्या आत्महत्येमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Published on: Jul 24, 2025 08:51 AM