Sangram Thopte : काँग्रेसला पुण्यात मोठा झटका? संग्राम थोपटे लवकरच भाजपात अन् रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे येत्या रविवारी राजीनामा देण्याची शक्यात असून ते लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे. तर २२ एप्रिल रोजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
पुण्यात काँग्रसेला मोठा धक्का बसणार असल्याची एक माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे लवकरच काँग्रसेला रामराम करत भाजपता प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांचा भाजपातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तर संग्राम थोपटे हे रविवारी काँग्रेस या पक्षाचा राजीनामा देणार आहेत. यासह भाजपा प्रवेशासंदर्भात संग्राम थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सोमवारी बैठक झाल्याचेही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान, संग्राम थोपटे हे तीन वेळा पुणे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. या मतदारसंघात त्यांचं मोठं वर्चस्व असून गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांचा दारूण पराभव झाला होता.
