Sanjay Raut on MVA | राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर लढला जातोय

Sanjay Raut on MVA | राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर लढला जातोय

| Updated on: Apr 18, 2022 | 11:00 PM

विक्रांतच्या घोटाळ्याआधी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले गेले, तुरुंगात डांबण्यात आले, त्या कारवाया सगळ्या राजकीय सूडापोटी केल्या गेल्या आहेत असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले.

विक्रांतचा मुद्दा शिवसेनेने नाही तर लोकांना याबाबत प्रश्न पडला असल्याने नागरिकांनी विक्रांतचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्यांनी विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा केले ते पैसे शासनाला दिले गेले नाही तर भाजप पक्षाकडे गेले आहेत. ज्यावेळी त्याबद्दल मुद्दा उपस्थित केला गेला त्यावेळी पैशाबाबत साधी कुणी पावतीही देऊ शकले नाहीत. विक्रांतच्या घोटाळ्याआधी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले गेले, तुरुंगात डांबण्यात आले, त्या कारवाया सगळ्या राजकीय सूडापोटी केल्या गेल्या आहेत असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले.