Shivsena UBT : ठाकरे गटाला मोठा धक्का; राऊत आणि दानवेंवर गंभीर आरोप अन् थेट सचिव पदाचा राजीनामा
Sanjay Lakhe Resigns : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत संजय लाखे पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे. संजय लाखे पाटलांकडून शिवसेना सचिव पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 14 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती. मात्र ती तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही, संजय राऊतांनी सांगलीत संजय पाटलांशी समझोता केला, त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.अंबादास दानवेंनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली, असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे.
