“गजानन कीर्तीकर यांच्याकडून शिवसैनिकांचा घात, ही तर सुरुवात, लवकरच सगळे बाहेर पडतील”, ठाकरे गटाचा हल्लाबोल

| Updated on: Aug 03, 2023 | 2:52 PM

भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य खासदार गजानन कीर्तीकर यांनी केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजप-शिवसेनेत सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे.

Follow us on

कोल्हापूर : भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य खासदार गजानन कीर्तीकर यांनी केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजप-शिवसेनेत सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे. “गजानन कीर्तिकरांना घरातला एक मोठा व्यक्ती म्हणून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी मान दिला.पक्ष सोडून गेल्यानंतर काय होतं हे कीर्तीकरांच्या लवकर लक्षात आलं ते बरं झालं. मानसन्मान मिळेल म्हणून तिकडे गेले होते.भाजप म्हणजे कढीपत्त्यासारखा वापर करून घेणारा पक्ष आहे.शिवसैनिकांचा घात करून सोडून गेलात बरं झालं हा अनुभव आला.ही सुरुवात आहे. लवकरच सगळे बाहेर पडतील.सगळ्यांनाच अनुभव वाईट येतील”, असं संजय पवार म्हणाले.