Sanjay Raut : विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून मोठी शंका उपस्थित; म्हणाले, सायबर हल्ल्याच्या माध्यमातून…

Sanjay Raut : विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून मोठी शंका उपस्थित; म्हणाले, सायबर हल्ल्याच्या माध्यमातून…

| Updated on: Jun 14, 2025 | 11:54 AM

खासदार संजय राऊतांनी आज सकाळी पत्र परिषद घेत, सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? असा सवाल केला आणि राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आणि एकच खळबळ उडाली.

एअर इंडियाचे विमान अहमदाबाद ते लंडन या दिशेने निघाले असताना टेकऑफच्या अवघ्या 30 ते 40 सेंकदात कोसळले. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला. यावर ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी मोठी शंका व्यक्त केली. ते म्हणाले, ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे हा अपघात कसा झाला? याविषयावर मी मत मांडणं योग्य होणार नाही. पण ड्रीमलायनरबाबत जेव्हा करार झाला होता. तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यासंदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानाची क्षमता, इंजिन याविषयी भाजपने शंका घातली होती. UPA च्या काळात या विमानांची खरेदी झाली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते. त्यांनी वारंवार त्याविषयीचा खुलासा केला होता. नेमका हा अपघात घडला कसा? 30 सेकंदात हे घडलं कसं? हा जगातील एव्हिएशन क्षेत्राला पडलेला प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.

एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी? कोणी सायबरच्या माध्यमातून विमानाची यंत्रणा हायजॅक केली का? पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत. ती गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प करण्यात येते. अनेकदा लष्कराचे नेटवर्क ठप्प करण्याचा प्रयत्न होतो. यंत्रणा तपास करत असताना त्यावर आताच काही बोलणं योग्य नाही, असं राऊत यांनी म्हणत संशय व्यक्त केला.

Published on: Jun 14, 2025 11:54 AM