Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशन विधेयकावर केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. हे विधेयक यापूर्वी नामंजूर झालं होतं, हा सत्ताधारी पक्षाला धक्का मानला जात होता. आता पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशन विधेयकावर केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. हे विधेयक यापूर्वी नामंजूर झालं होतं, हा सत्ताधारी पक्षाला धक्का मानला जात होता. आता पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
यापूर्वी INDIA आघाडीतील अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारसंघ पुनर्रचनेत देशातील लोकसभा जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आल्यास पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत महत्त्वाचे संकेत दिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या संकेतांनंतर मित्र पक्ष आणि ठाकरे गटकडून संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्ही अद्याप डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा दिलेला नाही, आमचा पाठिंबा आहे असं सांगणं चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं.
