Sanjay Raut | मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा आहे : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझं आतापर्यंत वेणुगोपाल, राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे. भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय ? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
