ते झंपी आम्हाला शिकवणार? संजय राऊतांची शिंदेंवर टीका

ते झंपी आम्हाला शिकवणार? संजय राऊतांची शिंदेंवर टीका

| Updated on: Jan 04, 2026 | 11:28 AM

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदुत्वावरून टीका केली. तसेच, भाजपने मुंबई लुटल्याचा आरोप करत, ३० लाख कोटींच्या कथित आरोपपत्राला प्रत्युत्तर दिले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बिनविरोध निवडणुका आणि नोटा पर्यायावर भाष्य केले.

संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रात जन्माला आले, तर औरंगजेब गुजरातमध्ये. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका.” भाजपने लावलेल्या ३० लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपपत्राला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

मुंबई लुटण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगावरही त्यांनी ताशेरे ओढले. बिनविरोध निवडणुका आणि नोटा पर्यायाचा संदर्भ देत, आयोगाला टी. एन. शेषन यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. तसेच, राहुल नार्वेकर आणि मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या प्रकरणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Published on: Jan 04, 2026 11:28 AM