Special Report | संजय राऊतांचा साडेतीन नेत्यांवर आरोपांचा बॉम्बगोळा!
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी अत्यंत जहरी भाषेत सोमय्यांवर टीका करताना त्यांनी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप केला.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी अत्यंत जहरी भाषेत सोमय्यांवर टीका करताना त्यांनी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप केला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज (mohit kambhoj) यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच मोहीत कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन डुबणार असल्याचा दावाही केला. राऊत सुमारे पाऊणतास बोलले. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले.
Published on: Feb 15, 2022 09:31 PM
