Sanjay Raut : ते भाजपचे हस्तक, सर्व दबावाखाली सुरू… जरांगेंसोबत उपोषणाला बसा, ‘या’ दोन नेत्यांची नावं घेत राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : ते भाजपचे हस्तक, सर्व दबावाखाली सुरू… जरांगेंसोबत उपोषणाला बसा, ‘या’ दोन नेत्यांची नावं घेत राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 31, 2025 | 2:04 PM

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले आंदोलन राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही जरांगे पाटील यांची शिंदे समितीचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदींचा मुद्दा प्रमुख होता.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांचं उपोषणही सुरू आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारसह भाजपच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले या दोघांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला बसावं’, असं संजय राऊत म्हणाले. इतकंच नाहीतर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे हस्तक असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला. सध्या जे सुरू आहे ते भाजपचा दबावाखाली सुरू असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Published on: Aug 31, 2025 02:04 PM