Sanjay Raut : रिक्षावाला आज 5 लाख कोटींचा मालक… हे ठाकरेंमुळेच शक्य; राऊतांचा शिंदेंवर पलटवार
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली. राऊत यांनी शिंदेंना रिक्षावाला ५ लाख कोटींचा मालक कसा झाला, असा सवाल करत उद्धव ठाकरेंमुळेच ते आजच्या पदावर पोहोचले असे म्हटले. शिंदेंनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही राऊत म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना गटप्रमुख नाहीतर ते कटप्रमुख असल्याचे म्हटले होते, यावर पलटवार करताना राऊत म्हणाले की, शिंदे गटप्रमुख नाहीत तर तेच कट प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे यांनीच अनेक नेत्यांना, विशेषतः एकनाथ शिंदे यांना राजकारणात मोठे केले, असे राऊत यांनी नमूद केले.
राऊत पुढे म्हणाले की, “तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज ५ लाख कोटींचा मालक कसा झाला? निवडणुकीवर ५०-१०० कोटी रुपये उधळतो. हे उद्धव ठाकरेंमुळेच शक्य झाले आहे, नाहीतर तुम्ही कोण होतात?” असा प्रश्न त्यांनी शिंदेंना विचारला. शिंदेंनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आत्मचिंतन करावे आणि आपण कोण होतो व कोणामुळे या पदावर आलो, याचा विचार करावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्यात दानत होती म्हणूनच सामान्य रिक्षावाले मंत्री आणि आमदार झाले, असेही राऊत यांनी म्हटले.
