Sanjay Raut : आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर… भावाच्या हातात हात अन् चेहऱ्यावर मास्क

Sanjay Raut : आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर… भावाच्या हातात हात अन् चेहऱ्यावर मास्क

| Updated on: Nov 17, 2025 | 10:12 PM

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आजारपणातही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर पोहोचले. डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत, कट्टर शिवसैनिक असलेल्या राऊतांनी मास्क लावून अभिवादन केले. सार्वजनिक जीवनातील त्यांचे हे पहिलेच दर्शन होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राऊत सार्वजनिक जीवनात पहिल्यांदाच घराबाहेर पडले. त्यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. दुर्धर आजार असतानाही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आदराने पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ते आपले बंधू सुनील राऊत यांच्यासह आले होते. आजारी असल्याने संसर्ग टाळण्यासाठी राऊतांनी चेहऱ्याला मास्क लावला होता. उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी हात उंचावत अभिवादन केले.

सुनील राऊतांचा हात हातात घेऊन संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे गेले. गुडघ्यावर बसत त्यांनी डोकं टेकवून आदरांजली वाहिली. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीची विश्रांती घेत होते. डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता. 31 ऑक्टोबर रोजी राऊतांनी एक जाहीर पत्र लिहून उपचारांमुळे पुढील दोन महिने घरीच राहणार असल्याचे सांगितले होते. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. मात्र, आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन असल्याने, कट्टर शिवसैनिक असलेल्या राऊतांनी आपले आजारपण बाजूला ठेवून थेट शिवाजी पार्क गाठत बाळासाहेबांना अभिवादन केले.

Published on: Nov 17, 2025 10:12 PM