Sanjay Raut : फडणवीस अन् राज ठाकरेंच्या ‘त्या’ भेटीत काय घडलं? राऊतांचा मोठा दावा, माझ्याकडे इत्यंभूत….
फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चेची इत्तंभूत माहिती असल्याचं खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे. रोखठोक मधून त्यांनी हा दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्तंभूत माहिती माझ्याकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरे वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये भेटले. दोघांमध्ये मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी पण ती एकतर्फीच असावी. फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. फडणवीसांच्या काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या.
मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा डाव आहे का? असा प्रश्न राज ठाकरेनी फडणवीसांना विचारला असावं अशी आशा आहे. मोदी आणि शहांना हवं तेच फडणवीस करणार आणि अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस हे एकाच वेळी सर्वांना खेळवू पाहताहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो आणि नेते त्याच तालावर नाचतात असं त्यांना वाटतं.
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या शिष्टमंडळावरही त्यांनी रोखठोक मधून टीका केलीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत का झुगळात? पाकिस्तानसोबतचे युद्ध का थांबवलं? असे सवाल एकाही खासदाराने मोदींना का विचारले नाहीत? पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेकडे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, हे गंमतीशीर आहे. मोदी हे पवारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची सहज चौकशी करू शकतात पण त्यांनी सुप्रिया सुळेकडे चौकशी केली.
