Special Report | रोखठोक संजय राऊत मवाळ का झाले ?

Special Report | रोखठोक’ संजय राऊत’ मवाळ का झाले ?

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 10:56 PM

कोरोनाच उगम चीनमधून झाला असतानाही त्याचं खापर महाराष्ट्रावर फोडणं चुकीचं असल्याचं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

कोरोनाच उगम चीनमधून झाला असतानाही त्याचं खापर महाराष्ट्रावर फोडणं चुकीचं असल्याचं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मोदींच्या टीकेला प्रतित्युत्तर देताना त्यांनी मी एकट्यानेच ठेका घेतला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकारमधील लोकं मोदींच्या टीकेला उत्तर का देत नाहीत असंही ते म्हणाले. त्यामुळे ज्या त्या पक्षांनी आपापली मतं मांडावी असं मतही त्यांनी व्यक्त केले. वाईन विक्रीवरून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका होत असून किरीट सोमय्या यांनी त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्याची मागणी केली. राजकीय वातावरणवर कोणतीही प्रतिक्रिया देताना संजय राऊत सडेतोड उत्तर देत होते आज मात्र नरेंद्र मोदींनी ज्यावेळी कोरोनावरुन कॉंग्रेसवर टीका केली तेव्हा संजय राऊत यांनी मी एकट्यानेच ठेका घेतला आहे का सवाल कॉंग्रेसला विचारला.