संजय राऊतांची तब्येत बिघडली, फोर्टिस रुग्णालयात दाखल

संजय राऊतांची तब्येत बिघडली, फोर्टिस रुग्णालयात दाखल

| Updated on: Nov 05, 2025 | 4:33 PM

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून राऊत सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माध्यमांपासून दूर होते. नियमित चाचण्या आणि पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, उपचारानंतर ते निवासस्थानी परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत ठीक नसल्याचे समोर आले होते. याच कारणामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येणे टाळले होते आणि याबाबत एक पत्रक देखील काढले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना नियमित वैद्यकीय चाचण्या आणि त्यांच्या आजारावरील पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही काळ ते माध्यमांशी संवाद साधत नव्हते आणि त्यांच्या नियमित कामापासूनही दूर होते. रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी परतणार असल्याची सध्या माहिती उपलब्ध आहे.

Published on: Nov 05, 2025 04:33 PM