आमची लढाई मिंधे गटाशी नाही, तर ‘या’ पक्षाशी; संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं…
ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आमची खरी लढाई मिंधे गटाशी नाही, तर भाजपशी आहे. आमच्याविरोधात लढावं एवढी मिंधे गटाची पात्रता नाही , असं संजय राऊत म्हणालेत. तसंच त्यांनी अमित शाह यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केलीय. अमित शाह महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असं राऊत म्हणालेत. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला असल्याचा पुनरूच्चार राऊतांनी पुन्हा एकदा केला.
Published on: Feb 20, 2023 11:22 AM
