Sanjay Raut UNCUT | अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?, राऊतांचा सरकारला प्रश्नांचा भडिमार

| Updated on: Mar 29, 2026 | 12:17 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी म्हटले की, खरातच्या संपर्कात असलेल्या सुमारे 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी तातडीने जाहीर केली जावी. “जर सरकार या प्रकरणात सामील नसेल, तर अशोक खरात याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री ‘कोणीही कोणासोबत फोटो काढू शकतो’ असे म्हणतात, यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, त्या मताशी ते सहमत असले तरी अशोक खरातसारखा व्यक्ती थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला, हा मुख्य प्रश्न आहे. यामध्ये काहीतरी मध्यस्थी किंवा दलाली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, अशोक खरात मंत्रालयात कसा पोहोचला आणि तो विविध मंत्र्यांच्या कामकाजात कसा हस्तक्षेप करत होता, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. केवळ काही व्हिडिओ पुराव्यांपुरते हे प्रकरण मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संबंधित गंभीर बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Published on: Mar 29, 2026 12:17 PM
Follow Us