लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला? संजय राऊत यांनी थेट सांगितलं…

| Updated on: May 19, 2023 | 10:23 AM

VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीतील जागावाटपावार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले...

Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती चुकीची असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय रऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये 16-16 जागांचा असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातील प्राथमिक चर्चा आता सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कोणी, कुठे बैठक घ्यायची याबाबत चर्चा झाली. मात्र जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि कायम राहिल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या मविआच्या वज्रमुठीनेच लढवल्या जातील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर कोणी काहीही म्हणो पण आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही आणि होणारही नाही, असा विश्वास व्यक्त करत सध्या सत्तेत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला घटनाबाह्य असल्याचे म्हणत सत्तेतून घालवू असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.  तसेच 2019 मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या 18 जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व 19 जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.