Sanjay Raut | सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा, संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं…
सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे, यावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, अजूनही महाराष्ट्र अजित दादांच्या जाण्याच्या दुःखातून सावरला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणी भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.
सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे, यावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, अजूनही महाराष्ट्र अजित दादांच्या जाण्याच्या दुःखातून सावरला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणी भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, यावर मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही. मात्र राष्ट्रवादीत नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रीय नेते आहेत. ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असणार असा टोला राऊत यांनी लगावला. मात्र पक्ष सत्तेत आहे म्हणून हा निर्णय अमित शाह यांनीच घेतला असणार असंही राऊत म्हणाले, भाजप हा ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी’ खाणारा पक्ष आहे. त्यामुळे ह्या पक्षाचा दुखवटा याच्याशी काही संबंध आला नाही, असं म्हणत थेट भाजपवर राऊतांनी निशाणा साधला आहे.
