Sanjay Raut : मविआत काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा! संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षालाही सोबत घेणे आवश्यक वाटते. ही त्यांची व्यक्तिगत भूमिका असली तरी, महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष समाविष्ट करताना सामूहिक चर्चा व निर्णय अपेक्षित आहे, असे राऊतांनी म्हटले.
संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. राऊत म्हणाले, राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षालाही समाविष्ट करून घेण्याची इच्छा आहे. तर महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष घेण्याबाबत कोणताही निर्णय सामूहिक चर्चेनंतरच घेतला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
पुढे संजय राऊत यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वावर भाष्य करताना म्हटले की, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना स्वबळावर निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, त्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, जसे की महायुतीमधील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचे निर्णय अमित शाह घेतात. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस एक महत्त्वाचा पक्ष असून, त्याचे स्थान आहे. त्यामुळे, शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश असणे आवश्यक असल्याची भूमिका राज ठाकरे यांचीही आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लवकरच एका शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.
