Sanjay Raut : ‘ते एकत्र आलेलेच आहेत’, पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका

Sanjay Raut : ‘ते एकत्र आलेलेच आहेत’, पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका

| Updated on: Apr 21, 2025 | 3:24 PM

अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत, असं उबठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. अजित पवार शरद पवारांचं स्वागत करतात. शिंदेंसोबत आम्हाला कोणाला एकत्र पाहिलं आहे का? असा प्रश्न देखील यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेलेच आहे. आम्ही कधी आत्तापर्यंत शिंदे गट किंवा एसंशिं यांच्याशी एकत्र आलेलं पाहिलं का? आम्ही त्यांना भेटलो आहे, बोललो आहे. किंवा चहा पिलाय त्यांच्यासोबत असं कधी दिसलं का? एकत्र व्यासपीठावर आलो का आम्ही? नाही. आम्ही असं नाही भेटणार. आमचं प्रेम तितकंच टोकाचं असतं आणि कडवटपणा देखील तेवढाच टोकाचा असतो,’ असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

Published on: Apr 21, 2025 03:24 PM