Special Report | राणेंसोबत ‘फाईट’…राऊतांची सिक्युरिटी टाईट !

Special Report | राणेंसोबत ‘फाईट’…राऊतांची सिक्युरिटी टाईट !

| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 10:32 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची सिक्युरिटी टाईट करण्यात आली आहे. त्यांना आधी वाय दर्जाची सुरक्षा होती. पण आता आणखी अतिरिक्त कमांडो वाढवण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची सिक्युरिटी टाईट करण्यात आली आहे. त्यांना आधी वाय दर्जाची सुरक्षा होती. पण आता आणखी अतिरिक्त कमांडो वाढवण्यात आले आहेत. याआधी वाय दर्जाच्या सेक्युरिटीमध्ये सात-अकरा जवान, त्यापैकी एक किंवा दोन कमांडो, दोन पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर आणि उर्वरित निमलष्करी दलाचे जवान सुरक्षेला असायचे. आता त्यांच्या ताफ्यात दोन एसपीयू जवान देखील तैनात होणार आहेत. यामगे नेमकं कारण काय? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !