Sanjay Raut : अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
Sanjay Raut On Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत राहावे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्र सांभाळावा हे पहिल्यापासूनच ठरलेले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच दिल्लीमध्ये काम करत आहे. मात्र दिल्ली सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार यांनी आता दाऊद इब्राहिम म्हणजेच भ्रष्ट प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला आहे. संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. ते आता काम पाहत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा प्रश्नच येत नाही. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा आहे. तर अजित पवार यांचा हा फुटलेला गट आहे. मूळ शिवसेना ही देखील उद्धव ठाकरे यांची आहे. तर एकनाथ शिंदे यांचा गट आहे. अमित शहा यांनी ठरवले म्हणून लोक ते स्वीकारणार नाहीत, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
