Sanjay Raut : स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून.. ; राऊतांचे अजित पवारांवर फटकारे

Sanjay Raut : स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून.. ; राऊतांचे अजित पवारांवर फटकारे

| Updated on: Jun 11, 2025 | 11:51 AM

Sanjay Raut On Ajit Pawar : शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जनतेची सेवा करायला गेले, असे कुणी म्हणत असेल, तर ते ढोंग आहे. सत्तेत ते यासाठी गेले की, त्यांना स्वतःची कातडी, स्वतः वरील कारवाया वाचवायच्या होत्या, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर आज पत्रकारांशी बोलताना लगावला आहे. सत्तेत राहून ज्यांनी मागील काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली, त्यांच्या चौकशा सुरू झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत गेले, असंही राऊत यांनी म्हंटलं.

यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, सत्तेत राहुन लोकांची कामे आधी करत येत होती. आता सत्ता ही फक्त तिजोरी लुटायलाच वापरली जाते. यावर अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणीही भाष्य करू शकणार नाही. गेल्या दहा वर्षांत भाजप आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रांत असा एकही विभाग नाही की, जिथे लुटमार केली नाही. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले, हे नरेंद्र मोदींना विचारा. सध्या देशात मजबूत सत्ता आहे. तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तानबरोबरचा संघर्ष यांना थांबवावा लागला. ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Jun 11, 2025 11:51 AM