Sanjay Raut : राणेंनी शिवसेना सोडल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला; राऊतांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

Sanjay Raut : राणेंनी शिवसेना सोडल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला; राऊतांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

| Updated on: Apr 17, 2025 | 11:28 AM

Sanjay Raut Slams BJP : नाशिकच्या शिबिरातून शिवसेना उबाठा गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील व्हिडीओ क्लिप ऐकवली. त्यावरून सत्ताधारी पक्षांकडून उबाठा गटावर जोरदार टीका देखील होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. 

गद्दारांना गद्दार नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे? ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती, त्यावेळी गद्दार हा शब्द बाळासाहेब ठाकरे यांनीच आणला. गद्दार या शब्दाचा अर्थच बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला समजावला, असं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. नाशिकच्या शिबिरातून शिवसेना उबाठा गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील व्हिडीओ क्लिप ऐकवली. या क्लिपमधून भाजप आणि शिंदेसेनेवर टीका करण्यात आली आहे. त्यावरून सत्ताधारी पक्षांकडून उबाठा गटावर जोरदार टीका देखील होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट हा अमित शाह यांनी बनवलेला आहे. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. त्यामुळे त्यांना यांच्यादडल काही तक्रार करायची असेल तर त्यांनी अमित शाह यांच्याकडे करावी, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हंटलं.

Published on: Apr 17, 2025 11:27 AM