Sanjay Raut : ठाकरे हाच ब्रँड बाकी सर्व ब्रँडीच्या बाटल्या, पण नशा… राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Sanjay Raut : ठाकरे हाच ब्रँड बाकी सर्व ब्रँडीच्या बाटल्या, पण नशा… राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

| Updated on: Sep 18, 2025 | 12:53 PM

शरद पवार आणि संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मोदींबद्दलच्या आत्मीयता दाखवणाऱ्या जाहिरातीवर टीका केली आहे. राऊतांनी जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अभाव आणि जिल्हा प्रमुखांच्या फोटोंचा समावेश यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पवारांनीही या जाहिरातीला "पान जाहिरात" असे संबोधले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नवीन जाहिरातींवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातींमध्ये शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले नातेसंबंध दाखवले आहेत. शरद पवार यांनीही या जाहिरातींवर टोला लगावला आहे. तर संजय राऊत यांनीही या जाहिरातींवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अभाव असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जाहिरातीत जिल्हा प्रमुखांच्या फोटोंचा समावेश का केला आहे याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदींच्या वाढदिवसानंतर प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातींमुळे राज्यातील राजकारण अधिक तापले आहे. तर दुसरीकडे फडणवीसांनी बेस्ट निवडणुकीच्या निकालावर बोलताना ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला असे म्हणत हल्लाबोल केला होता. त्यालाही राऊतांनी उत्तर दिलंय.

Published on: Sep 18, 2025 12:53 PM