हा मोकाट सुटलेला सांड फडणवीसांनासुद्धा..; संजय राऊतांची टीका कोणावर?

हा मोकाट सुटलेला सांड फडणवीसांनासुद्धा..; संजय राऊतांची टीका कोणावर?

| Updated on: Jul 28, 2025 | 2:14 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना "मोकाट सांड" म्हंटले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना “मोकाट सांड” म्हंटले. ते म्हणाले, गिरीश महाजन हा मंत्रिमंडळातील बेलगाम सांड आहे. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेचा त्यांना क्रूर आनंद होताना दिसतो. हा आनंद पाहिल्यावर काय घडत आहे आणि काय घडवले जात आहे, हे स्पष्ट होते, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, आम्ही राजकारणात कुणाच्या कुटुंबाला लक्ष्य करत नाही, पण दुर्दैवाने भाजपवाले कुटुंबापर्यंत पोहोचतात आणि त्यांना बदनाम करतात. गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ खडसे हनी ट्रॅप प्रकरणावर बोलत होते. या प्रकरणात काही जणांना अटक झाली आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी होती. खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या या प्रकरणातील कथित सहभागावरही भाष्य केले होते, पण त्याचा तपास होत नाही, त्यांच्यावर छापे पडत नाहीत, आणि पोलिसांना याबाबत जाग येत नाही. मात्र, खडसे बोलले म्हणून अचानक त्यांच्या जावयाला ताब्यात घेतले गेले. अशा प्रकारच्या कारवाया महाराष्ट्रभर सुरू आहेत.

राऊत पुढे म्हणाले, पोलिस सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या घरी जातात, त्यांच्या घरात शिरतात, त्यांच्या मित्रांनाही लक्ष्य करतात. पोलिस हे सरकारचे नोकर बनले आहेत. भाजप तर आता गुंडांच्या रेव्ह पार्टीसारखी झाली आहे. संपूर्ण भाजपमध्येच रेव्ह पार्टीचे वातावरण आहे.

Published on: Jul 28, 2025 02:14 PM