Sanjay Raut : लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; संजय राऊतांची महायुतीवर टीका
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून पत्रकार परिषदेत टीका केली आहे.
निवडणुकीपूर्वी 1500 निवडणुकीच्या प्रचारावेळी 2100 देऊ अशी घोषणा केली आणि देताय किती तर 500 रुपये ही लाडक्या बहीणींची फसवणूक आहे. लाडकी बहीण योजना जवळपास बंद झाली आहे, असा टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, अजित पवार म्हणतात कर्जमाफीबद्दल मी बोललो नाही, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ना? लाडक्या बहीणींना 2100 रुपये देतो मी म्हटलो नाही, पण सरकार तर तुमचेच आहे ना? आता प्रत्येक मंत्री म्हणतात माझा पैसा, माझा पैसा हा तुमचा कसला पैसा. शिंदेंचा एक मंत्री म्हणतो माझा पैसा वळवला पण तो लाडक्या बहिणीसाठीच दिला ना तुम्हाला कशाला पाहिजे. लाडक्या बहीणीला पैसा दिला म्हणून आता रडणारे मतदान मिळावे म्हणून पैसा दिला तेव्हा हसत होते, असा टोला देखील राऊतांनी शिरसाट यांचे नाव न घेता लगावला आहे.
Published on: May 04, 2025 12:51 PM
