Sanjay Raut : ‘ती बाई साधी नाही…मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा…’, तुलसी गबार्डचं नाव घेत राऊतांचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रयागराजच्या महाकुंभातून आणलेले गंगाजल त्यांना भेट म्हणून दिले. यावरून राऊतांनी जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं, असं म्हणत ठाकरे गट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकचा पराभव का झाला? यावर बोलताना जोरदार हल्लाबोल केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्यावर भाष्य करत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘तुलसी गबार्ड. नाव लक्षात ठेवा. ही साधी बाई नाही. मोदीची बहीण आहे. मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात. मोदी आता अमेरिकेत गेले होते. तेव्हा गंगाजल घेऊन गेले होते. तुलसी गबार्डला गंगाजल दिले. ही बाई साधी नाही. ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागात आहे. तिने सांगितलं परवा. ईव्हीएम हायजॅक होतंय. ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात’, असं राऊत यांनी म्हटलंय. तर ईव्हीएम हायजॅक होतंय, हे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने आणि मोदीच्या बहिणीने सांगितलं. तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटं बोलणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार घणाघात केला.
