Sanjay Raut Live | चंद्रकांतदादा गोड माणूस, चंद्रकांतदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा : संजय राऊत

Sanjay Raut Live | चंद्रकांतदादा गोड माणूस, चंद्रकांतदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 12:04 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा राऊतांनी दिल्या. | Sanjay Raut Chandrakant patil

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदेश दिल्याश आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये (Nashik) ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा राऊतांनी दिल्या. | Sanjay Raut Chandrakant patil

Published on: Jun 10, 2021 12:04 PM