Pune | संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मोठ्या उत्साहात पंढरपूरला रवाना, पालखी सोहळ्याची ड्रोन दृश्य

| Updated on: Jul 19, 2021 | 2:31 PM

संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मोठ्या उत्साहात पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. शांतता पाहायला मिळत असली, तरी ती इंद्रायणी अजूनही वारकऱ्यांची वाट पाहतीये.

Follow us on

संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मोठ्या उत्साहात पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. शांतता पाहायला मिळत असली, तरी ती इंद्रायणी अजूनही वारकऱ्यांची वाट पाहतीये. इंद्रायणीचा काठ ओस पडला. गेल्या वर्षीची खंत यंदा भरून निघेल. देहू आणि आळंदी वारकऱ्यांनी फुलून जाईल असं वाटलं. मात्र पदरी निराशा पडली. असं जरी असलं, तरी ज्या ज्या वेळी समाजावरती संकट ओढावलं त्या त्या वेळी वारकरी सांप्रदायानं दिशा दाखवली आणि सहिष्णू म्हणजेच संयमाचा मार्ग पत्करला. त्या प्रमाणेच यंदाही वारकऱ्यांची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेण्याबरोबरचं आरोग्याची पताकाही खांद्यावर घेतली आणि एसटीतूनचं वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वारकऱ्यांनी वारकरी धर्माची परंपरा खंडीत न होऊ देता मोठ्या मनाने यंदाचा सोहळा करण्याचं ठरवलंय. त्यामुळे जरी मनात खंत असली तरी मानाचे वारकरी मात्र उत्साहात प्रस्थान सोहळा पार पाडतील.