Pandharpur Wari 2025 : नीरा नदीत संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं स्नान; नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

Pandharpur Wari 2025 : नीरा नदीत संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं स्नान; नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

| Updated on: Jun 26, 2025 | 1:05 PM

Pandharpur Wari Sohala : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत विधीपूर्वक स्नान घालण्यात येणार आहे. हा भावनिक सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली आहे.

नीरा नदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान घालण्यात येणार आहे. आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत  विठू नामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं आज दुपारी 1 वाजता निरा नदीत पारंपरिक स्नान सोहळा पार पाडणार आहे. पादुकांना स्नान घालण्याचा हा सोहळा पालखी सोहळ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण मानला जातो. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी सध्या नीरा नदीच्या काठावर जमा झाले आहेत.

या स्नानानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. यानंतर पालखीची सुरक्षा जबाबदारी पुणे पोलिसांकडून सातारा पोलिसांकडे औपचारिकपणे हस्तांतरित केली जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, दोन्ही जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Published on: Jun 26, 2025 01:05 PM