Pandharpur Wari : नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं निरास्नान

Pandharpur Wari : नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं निरास्नान

| Updated on: Jun 26, 2025 | 4:02 PM

Pandharpur Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज विधीवत पूजा करून निरास्नान घालण्यात आलं आहे.

ग्यानबा-तुकाराम नामाचा जयघोष करत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधीवत पूजा करून निरास्नान घालण्यात आलं आहे. पादुकांना शाही स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी व तुळशीहार अर्पण करून पाद्य पूजन करण्यात आले. यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. परंपरे प्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलींच्या पादुकांचे दत्त घाटावर शाही स्नान होते. यावेळी भक्तांचेही स्नान होते. यामुळे सोहळ्याला नवी ऊर्जा मिळते अशी भावना आहे. पूर्ण वारी आणि पालखी सोहळ्यातला हा अत्यंत महत्वाचा आणि भावनिक टप्पा मानला जातो. या सोहळ्याला याची देही याची डोळा बघण्यासाठी निरा नदीच्या काठी वारकरी भक्तांनी मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली. ज्ञानोबांच्या पादुका स्नानाच्या वेळी भक्तांनी एकच जल्लोष केलेला यावेळी दिसून आला. या सोहळ्यानंतर आता माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला आहे. पुढचे 4 दिवस पालखीचा मुक्काम साताऱ्यात असणार आहे.

Published on: Jun 26, 2025 04:02 PM