Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्याकडून मोठी अपडेट, वाल्मिक कराडसह आरोपींवर….

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्याकडून मोठी अपडेट, वाल्मिक कराडसह आरोपींवर….

| Updated on: Dec 23, 2025 | 2:12 PM

बीड येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांवर अखेर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. खंडणी वसुलीस अडथळा ठरल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपींनी खटला लांबवण्याचे प्रयत्न केले होते, ज्याला न्यायालयाने चाप लावला.

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर आरोप निश्चित झाले. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची कट रचून हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराड याला आबाडा कंपनीकडून खंडणी मिळण्यास संतोष देशमुख यांनी अडथळा केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे सरकार पक्षाने न्यायालयात सांगितले. आरोपींकडून खटला लांबवण्यासाठी डी टू ऑपरेशन केले जात होते, परंतु आरोप निश्चित झाल्याने आता या प्रयत्नांना चाप बसला आहे. पुढील सुनावणी ८ किंवा ९ जानेवारी रोजी होणार असून, लवकरच साक्षीदारांची तपासणी आणि पुरावे सादर करण्याचे काम सुरू होईल. आरोपींनी वारंवार वकील बदलल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण जलदगतीने चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Published on: Dec 23, 2025 02:04 PM