Phaltan Doctor Case: शरण येण्यापूर्वीच PSI बदनेचा खतरनाक प्लान? पुरावे सापडता सापडेना, नेमकं काय केलं? डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट
फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाल बदनेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस खात्यात काम करत असल्याने त्याला मोबाईलचे पुरावे म्हणून असलेले महत्त्व माहीत होते. त्याने अद्याप मोबाईलबाबत माहिती दिली नसून, तपासात सहकार्य करत नाहीये. दोन्ही आरोपींचा मृत डॉक्टरशी असलेला संबंध पोलीस तपासत आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने याने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल फोन लपवला आहे. विशेष म्हणजे, बदने हा पोलीस खात्यात कार्यरत असल्याने त्याला गुन्ह्यातील पुराव्याचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच त्याने आपला मोबाईल लपवला असून, पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे सूत्रांकडून समजते.
गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोन्ही आरोपी मृत डॉक्टर महिलेच्या संपर्कात असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मात्र, गोपाल बदनेने मोबाईल लपवल्याने पोलिसांना नेमके पुरावे मिळत नाहीत. पोलीस पथके बदनेच्या मोबाईलचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणातला दुसरा आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कोठडी आज संपत असून, पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. मृत डॉक्टर आणि आरोपींचा नेमका संबंध काय, तसेच आत्महत्येपूर्वी त्यांच्यात काय संभाषण झाले होते, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
