हा झालेला निर्णय…., केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया

हा झालेला निर्णय…., केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 18, 2023 | 8:18 PM

VIDEO | केंद्रीय आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले, या निर्णयानंतर काय म्हणाले अपक्ष आमदार सत्यजीत तांबे बघा व्हिडीओ

अहमदनगर : अहमदनगर येथे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा झालेला निर्णय ही तांत्रिक बाब असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे तर एका बाजूला पक्षाची घटना तर दुसऱ्या बाजूला लोकांचा पाठिंबा त्यातून केंद्रीय निवडणूक आयोगाने अतिशय तांत्रिक पद्धतीने हा निर्णय दिला असल्याचे मतही सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे. तर हा निर्णय समजून घेणे आणि त्याच्यावर अभ्यास करणे हा कायदे पंडितांसाठी अभ्यासाचा विषय असून फार किचकट कायदेशीर प्रक्रियेतून झालेला निर्णय असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 18, 2023 08:18 PM