विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जात प्रमाणपत्रासाठीचे हेलपाटे थांबणार, पण त्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम

| Updated on: Sep 19, 2022 | 1:23 PM

आठवड्याभरातच विद्यार्थ्यांना आता जात प्रमाणपत्र मिळू शकेल. त्यामुळे जात प्रमाणपत्रासाठी सराकरी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे थांबतील. पण त्यासाठी एक काम विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा किंवा कॉलेजातच करावं लागेल.

Follow us on

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांला (Student) लागणाऱ्या कास्ट सर्टिफिकेटबाबत (Cast Certificate) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कास्ट सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, ऊसतोड कामगार प्रमाणापत्र नागरिकांना मिळावे, यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉक्टपर प्रशांत नारनवरे (Prashant Narnaware) यांनी याबाबतची माहिती दिली. ते उस्मानाबादमध्ये टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे विद्यार्थ्यांना शाळेतच आता जात प्रमाणपत्र देण्यात येईल. सात दिवसांच्या आतच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सुपूर्द केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यासाठीचे संबंधित विद्यार्थ्यांना आजोबांचे किंवा वडिलांचे दाखले, रहिवासी दाखला, इत्यादी संबंधित कागदपत्र शाळेतच द्यावी लागतील. शाळेत दक्षता पथकांकडून या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांत जात प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि परवडही थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे काही कागदपत्रांची अडचण असल्यास किंवा काही पुरावे नसल्यासही विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं कारण नाहीय. जात पडताळणी समितीच्या वतीने काही विद्यार्थ्यांना प्रमाणित केलं जाईल आणि त्यानंतर त्यांची पडताळणी करुन जात प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.