पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा उलटली अन् पोरं…
कल्याणमधील वालधुनी येथील मार्टिन चौक परिसरात शुक्रवारी सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव बस समोर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला. या दुर्घटनेत 4 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधीही चेंबूरमध्ये अपघात झाला होता ज्यामध्ये एका चिमुकल्याने जीव गमावला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, वालधुनी परिसरातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकाजवळ असलेल्या नॅशनल उर्दू शाळेत विद्यार्थी जात होते. रिक्षामध्ये 6 विद्यार्थी आणि चालक प्रवास करत होते. याचवेळी समोरून वेगाने येणारी बस पाहून चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यावर पलटली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना रिक्षाबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 3 विद्यार्थ्यांवर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एका विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.