Solapur flood :  सोलापूरच्या माढ्याला पावसानं झोडपलं, शेतपीकं पाण्याखाली अन् शेतकरी संकटात, पूरग्रस्त भागातून tv9 चा रिपोर्ट

Solapur flood : सोलापूरच्या माढ्याला पावसानं झोडपलं, शेतपीकं पाण्याखाली अन् शेतकरी संकटात, पूरग्रस्त भागातून tv9 चा रिपोर्ट

| Updated on: Sep 23, 2025 | 4:01 PM

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मका, उडीद आणि ऊस ही पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याने ते संकटात सापडले आहेत. सरकारकडून पुरेशी मदत देण्याची मागणी केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सीना नदीने पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसांपासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आठ ते दहा गावांना याचा पुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची मका, उडीद आणि ऊस पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० ते ८५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे परंतु ते अपुऱ्या आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना हेक्टरी ५०००० रुपयांहून अधिक मदत मिळावी. जनावरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याबाबत लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Published on: Sep 23, 2025 04:01 PM