Shani Shingnapur : 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय, कारण काय?

Shani Shingnapur : 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय, कारण काय?

| Updated on: Jun 15, 2025 | 8:27 AM

शनि शिंगणापूर देवस्थानात कार्यरत असणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. त्यामध्ये 114 कर्मचारी हे मुस्लिम धर्माचे होते. हिंदूंच्या मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचारी कसे? असा सवाल करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या.

अहमदनगर मधल्या शनि शिंगणापूर देवस्थानाने घेतलेल्या निर्णयाची सध्या चांगली चर्चा आहे. शनि शिंगणापूर देवस्थानात कार्यरत असणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. यात काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनियमितता आणि शिस्तीच पालन न केल्याचा ठपका ठेवत त्यांना काढून टाकल्याचं स्पष्टीकरण शनि देवस्थानकडून देण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांनी दबाव आणला होता. शनि देवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांकडून काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. तर मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा देखील काढण्याचा इशारा देण्यात आला होता.

शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद वाढला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावं अशी या संघटनांची मागणी होती. अन्यथा 14 जूनला मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढला जाईल असा इशारा देखील दिला गेला. मोर्चा काढण्या आधीच देवस्थानकडून या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलाय.

Published on: Jun 15, 2025 08:27 AM