NCP : …म्हणून दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येणं फिस्कटलं, अजितदादांची ‘ती’ एक चूक अन् शरद पवारांचा नकार

NCP : …म्हणून दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येणं फिस्कटलं, अजितदादांची ‘ती’ एक चूक अन् शरद पवारांचा नकार

| Updated on: Jun 19, 2025 | 8:47 AM

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या भूमिकेमुळे एकत्र येणं फिसकटल्याची माहिती. नेमकं काय घडलं?

बारामतीतल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी जी तटस्थ भूमिका घेतली त्यावरूनच दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येण्याचं फिसकटलं अशी सूत्रांची माहिती आहे. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार होती. शरद पवारांनी अजित पवारांकडे सहा जागांची मागणी केली होती. मात्र अजित दादा शरद पवारांना चार जागा देण्यास तयार होते. मात्र चर्चा ऐनवेळी फिसकटली आणि अजित दादांनी सर्व उमेदवारांचं पॅनल जाहीर केलं. दादांच्या घोषणेनंतर पवारांना बळीराजा पॅनलची घोषणा करावी लागली.

अजित दादा आता अशी भूमिका घेत असतील तर पक्षाच्या निष्ठावंतांचं काय होणार असं शरद पवारांचं मत आहे. निवडणुकीची वेळ येऊ नये आम्हाला सोबत घ्यावं अशी भूमिका पवारांची होती. पण अजित पवारांनी स्वतःला चेअरमन घोषित करत स्वतःचं पॅनल उभं करून उमेदवार दिले. त्यामुळे टोकाची भूमिका घेण्याची माझी इच्छा नाही असं शरद पवारांनी बोलून दाखवलं.

साखर कारखान्याच्या निवडणुकीत सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर पुढे काय असं मत शरद पवारांचं झाल्याचं कळतंय. त्यामुळे अजित पवारांसोबत एकत्र येण्यावरून बसून निर्णय घेऊ असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे आता ही चर्चा फक्त मिडीयातच आहे. आम्ही एकत्र येऊ असं कधीच बोललो नाही असं म्हणतायत.

Published on: Jun 19, 2025 08:47 AM